Loan EMI

EMI कसा कमी होईल

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

रेटिंग एजन्सी क्रिसिलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डी. के. जोशी यांच्या मते, भारताच्या वित्तीय तुटीकडे जगाने लक्ष देण्याची गरज आहे. वित्तीय तूट कमी होणे हे एक अनुकूल लक्षण आहे. त्यामुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. रिझर्व्ह बँकेवरील ताण कमी होईल. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यासाठी RBI जबाबदार आहे. महागाई कमी झाल्यास आरबीआयवरील दबाव कमी होईल. रेपो दर 6.5 टक्क्यांच्या खाली येईल. डिसेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.69 टक्के होता. रेपो दर कमी झाल्यास EMI कमी होईल.

RBI ने गेल्या एप्रिल 2023 पासून रेपो दर अपरिवर्तित ठेवले आहेत. ग्राहकांसाठी ही तात्पुरती मलमपट्टी असेल. कारण ग्राहकांना आधीच वाढलेल्या व्याजदरासह ईएमआय भरावे लागत आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.5 टक्के होता. तेव्हापासून रेपो दरात बदल झालेला नाही. रेपो दरात कपात न केल्यामुळे व्याजदर वाढले आहेत. त्याचा फटका बसला आहे.