1 Rupayat Pik Vima Yojana फक्त १ रु. पीक विमा योजना, ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो, 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra 2023 आज आपण 1 रुपायत पिक विमा योजना महाराष्ट्र योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जिथे शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे. या लेखात आपण 1 रुपयात उपलब्ध असलेल्या पीक विमा योजनेची सर्व माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठी काय आवश्यक आहे, कागदपत्रे, या योजनेचा फायदा कोणत्या पिकांसाठी होणार आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे केव्हा, कोठून आणि कधीपासून विमा भरता येतो.        PIK Vima 2023 last date

फक्त १ रु. पीक विमा योजना

ऑनलाइन अर्ज

PIK Vima 2023 Maharashtra राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना (1 रुपयत पिक विमा योजना) लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.